आरक्षण असेल तरच पॅसेंजरमध्ये प्रवेश
कोरोना प्रादुर्भावामुळे बंद असलेल्या कोकणातील पॅसेंजर ट्रेन जवळपास दोन वर्षानी गणेशोत्सवानिमित्त सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मात्र कोरोनाच्या निर्बंधामुळे या ट्रेन संपूर्ण आरक्षित असणार आहेत.
या ट्रेनला जादा थांबे असल्याने प्रवाशांना फायदा होणार आहे. दिवा-सावंतवाडी, दिवा-रत्नागिरी आणि रत्नागिरी-मडगांव या गाड्या पुन्हा एकदा पुन्हा सुरू करण्यात येणार आल्या आहेत. या पॅसेंजर गाड्या सिटींग असून त्याचे आरक्षण सोमवारपासून सुरू करण्यात येणार असल्याने चाकरमान्यांचा फायदा होणार आहे. कोरोना साथीमुळे गेल्या वर्षी गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. यंदाही गणेशोत्सव फारशी गर्दी न करता घरगुती स्वरूपात साजरा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. कोकणातील नियमित गाड्यांचे आरक्षण १२० दिवसांपूर्वी फुल्ल झाले आहे. तर जून महिन्यापासून आतापर्यंत तब्बल २१३ गणपती विशेष ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. आतापर्यंत यातील ९० टक्के गाड्यांची तिकिटे आरक्षित होवून प्रवाशांच्या हाती तिनशेच्या पुढील वेटींग लिस्ट पडली आहे. सोडलेल्या पॅसेंजर गाड्यांमुळे चाकरमान्यांना फायदा होणार आहे. कोरेची दिवा ते सावंतवाडी, दिवा ते रत्नागिरी आणि रत्नागिरी ते मडगांव या पॅसेंजर गाड्यांचा यात समावेश असून या पॅसेंजर गाड्यांना सर्व स्थानकांना थांबा देण्यात आला आहे. मात्र या गाड्यांना जनरल तिकिटे मिळणार नाहीत. केवळ आरक्षित प्रवाशांनाच यातून प्रवास करता येणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
www.konkantoday.com