
शेततळ्याचे सव्वादोनशे प्रस्ताव तांत्रिक त्रुटींमुळे रखडले
शेतकऱ्यांना लागवडीसाठी उद्युक्त करताना मागेल त्याला शेततळे योजना प्राधान्याने कोकणात राबवण्यात आली. मात्र, ऑनलाईन प्रस्तावित असलेल्या या योजनेबाबत शेतकरी अनभिज्ञ असताना पाठवण्यात आलेल्या प्रस्तावंपैकी सव्वादोनशे प्रस्ताव तांत्रिक त्रुटींमुळे रखडलेले आहेत.खरीप हंगमाची चारमाही शेतीव्यतिरिक्त कोकणातही बारमीही शेती करता यावी यासाठी शासनाने मागेल त्याला शेततळे योजना कोकणात प्राधान्याने राबवली. या योजनेअंतर्गत कोकणातील भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन शेततळ्यासाठी रक्कम ७५ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. यापूर्वी शेततळ्याचा लाभ न घेतलेल्या जिल्ह्यातील शेतकर्यांनी राज्य शासनाच्या महाडीबीटी संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने नोंद करून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतंर्गत वैयक्तीक शेततळे योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी ऑनलाईन प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या; मात्र, ऑनलाईन प्रस्तावाबाबत येथील शेतकरी अनभिज्ञ राहिल्याने योजनेला अल्प प्रतिसाद मिळाला तर शेतळ्यांसाठी पाठवण्यात आलेल्या प्रस्तावर त्रुटीअसल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील ६७, रायगडमधील १०२ आण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५६ प्रस्ताव रखडलेले आहेत.