सहकार खात्याने गठीत केलेल्या थिंक टॅंक मध्ये अँड. दीपक पटवर्धन यांचा सदस्य म्हणून समावेश.
सहकार खात्याने राज्यातील सहकार चळवळीतील कार्यपद्धती मधील त्रुटी व करावयाच्या सुधारणा या बाबत अभ्यास करण्यासाठी अभ्यास गट गठीत केले आहेत पत संस्था चळवळीतील कार्यपद्धती मधील दोष, त्रुटी व त्यावरील उपाययोजना यांचा अभ्यास करण्यासाठी उपसमिती गठीत केली असून त्या समितीत स्वामी स्वरूपानंद पत संस्थेचे अध्यक्ष व विधिज्ञ दीपक पटवर्धन यांनी नियुक्ती करण्यात आली आहे राज्यातील 11 सदस्यांचा अभ्यासगट तयार करण्यात आला अप्पर निबंधक डॉ. पांडुरंग खंडागळे यांचे सह सहा वरिष्ठ अधिकारी तसेच अन्य 5 सदस्य असा अभ्यास गट निर्माण करण्यात आला आहे.महाराष्ट्र सहकार कायदा बदल अपेक्षित आहे त्या पार्श्वभूमीवर हा अभ्यासगट महत्वपूर्ण असून नवीन तरतुदी सुचवण्याची सहकार चळवळ गतिमान करण्यासाठी ह्या अभ्यास गटाने काम करणे अपेक्षित आहे.
सहकार चळवळीतील अभ्यास गटात समावेश ही खूप उत्तम संधी आहे माझा अनुभव कायद्याबाबत ची माहिती वापरत पत संस्था चळवळ अधिक गतिमान व्हावी उपयुक्तता वाढावी म्हणून प्रस्ताव सुचवता येतील याच समाधान आहेअसेही पटवर्धन यांनी म्हटले आहे
www.konkantoday.com