
येत्या चार दिवसांत महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील वाहतूक पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा
जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे बंद पडलेली आंबेनळी घाटातील वाहतूक तीन – चार दिवसांत सुरु होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यासाठी कंबर कसली असून घाटातील रस्ता दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहेयेत्या चार दिवसांत महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील वाहतूक पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबेनळी घाटातील रस्ता तुटला होता. अनेक ठिकाणी मोठ मोठ्या दरडी कोसळल्या होत्या. डोंगरातून वाहणारा पाण्याचा प्रवाह दरडींमुळे घाटरस्त्यावरुनच वाहत होता. त्यामुळे पूर्ण दरडींचा मलबा रस्त्यावर पसरला होता. मोठ मोठे दगड रस्त्यावर आलेच होते. शिवाय काही ठिकाणी रस्ताही खचून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या संकटामुळे गेली दीड महिना ही घाट वाहतूक बंद आहे. ही वाहतूक सुरू करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने घाट रस्ता दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे.
www.konkantoday.com