गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी आतापर्यंत २ हजार १०९ एसटी गाड्या आरक्षित झाल्या

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी करोना चाचणीची अट कायम आहे. प्रवासाच्या ७२ तासांआधीचा ‘आरटीपीसीआर’ अहवाल किंवा दोन लसमात्रा असल्या तरच कोकणात प्रवेश मिळेल, असे प्रशासनाने स्पष्ट के ले.या दोन्हींपैकी काहीही नसल्यास गणेशभक्तांना चाचणीला सामोरे जावे लागेल.
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी आतापर्यंत २ हजार १०९ एसटी गाड्या आरक्षित झाल्या आहेत. त्यात गट आरक्षणाच्या एसटींचाही समावेश आहे. मुंबई, ठाणे, पालघर तसेच पुण्यातून या गाड्या कोकणाकडे रवाना होतील. ४ सप्टेंबरला ४९ एसटी, ५ सप्टेंबरला ६६ एसटी सुटतील. ७ सप्टेंबरला ४०१ आणि ८ सप्टेंबरला सर्वाधिक १ हजार २२९ एसटी कोकणाच्या दिशेने जातील. याशिवाय २१७ हून अधिक विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. एकच मात्रा घेतलेल्या प्रवाशांनीही आरक्षण के ले आहे. एसटी स्थानक, आगार आणि रेल्वे स्थानकाबाहेर करोना केंद्र उभारण्यात येणार आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात येणाऱ्यांना ७२ तास आधीचा करोना चाचणी अहवाल सादर करावा लागेल किं वा दोन लसमात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. दोघांपैकी काही नसल्यास आगार किं वा स्थानकात उभारलेल्या करोना चाचणी केंद्रात चाचणी करण्याची सुविधा असेल. या चाचणीची सर्व माहिती प्रशासनाकडे असेल. कोकणात येताच प्रत्येक रेल्वे, एसटीतून येणाऱ्या प्रवाशांचे नाव, मोबाईल क्र मांक यासह सर्व यादी चालक, वाहक आणि रेल्वेडून तेथे उपस्थित संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. त्यामुळे कोकणात आलेल्या प्रवाशांनी चाचणी न के ल्यास त्याची माहिती त्वरीत उपलब्ध होईल आणि त्या व्यक्तीची गावात जाऊन ग्रामकृती दलाकडून चाचणीही होणार आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button