
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली
मराठा समाजाचा सामाजिक व आर्थिक मागास वर्गामध्ये समावेश करून त्यांना शैक्षणिक संस्था व सरकारी नोकरीत आरक्षण देण्यासाठी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन केली. शिष्टमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण, काँग्रेसचे संग्राम थोपटे, शिवसेनेचे विनायक राऊत तसेच भाजपचे रणजितसिंग नाईक निंबाळकर यांचा समावेश होता. कोविंद यांना मागणीचे निवेदन देण्यात आले,
www.konkantoday.com