डॉ. अशोक बोल्डे यांनी दिलेली माहिती खोटी, माझी प्रतिमा जनमानसामध्ये मलीन करण्याचा हेतू -डॉ. फुलेंचे स्पष्टीकरण
रत्नागिरीचे पूर्वीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी जाणीवपूर्वक पाच महिने शासकीय निवासस्थान सोडले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव मार्च २०२१ मध्ये निवासस्थान जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने ताब्यात घ्यावे लागले. तेथील त्यांचे सामान परत देण्यासाठी कळविल्यानंतर बोल्डे सामान घेण्यासाठी दहा मिनिटात परत येतो, असे सांगून ते निघून गेले, ते परत आलेच नाहीत. सामानाबाबत त्यांनी दिलेली माहिती खोटी आहे. रूग्णालयाची आणि माझी प्रतिमा जनमानसामध्ये मलीन करण्याचा त्यांचा हेतू दिसून येतो, असे स्पष्टीकरण जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एस. गावडे (डॉ. संघमित्रा फुले) यांनी दिले आहे.
दरम्यान बोल्डे हे त्यांचे सामान ताब्यात घेण्यासाठी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक ३१ ऑगस्टला कार्यालयात आले. तरीही त्यांचे सामान ताब्यात देण्याची सर्व तयारी केली. तेव्हा डॉ. बोल्डे यांनी सामान घेण्यासाठी दहा मिनिटात परत येतो, असे सांगून गेले, ते परत आलेच नाहीत. त्यामुळे उपस्थित पंचांना नाहक दोन तास ताटकळत रहावे लागले असल्याचा आरोप त्यांनी केला www.konkantoday.com