
जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा आज अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी केली यावेळी उपाध्यक्ष उदय बने, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, जि. प. सदस्य बाबूशेठ म्हाप, रचना महाडिक आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. जाधव म्हणाले की, जिल्हा परिषद आदर्श शिक्षकपुरस्कारासाठी एकूण २२ प्रस्ताव या कार्यालयाकडे प्राप्त झाले. दिनांक ५ ऑगस्ट रोजी मुलाखत घेण्यात आली. मुलाखतीसाठी २२ पैकी १९ शिक्षक उपस्थित होते, अशी माहिती श्री. जाधव यांनी दिली.पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या जिल्हा परिषद आदर्श शिक्षकांची यादी खालीलप्रमाणे -- *मंडणगड - श्री. एकनाथ आत्माराम चांदे, पदवीधर शिक्षक, जि. प. पू. प्राथ.आदर्श शाळा शेडवई, दापोली - श्री. महेश राजाराम कोकरे, उपशिक्षक जि. प.आदर्श मराठी शाळा मौजे दापोली, खेड- श्री. राजेश रघुनाथ भागणे उपशिक्षक, जि.प.आदर्श प्राथ.शाळा कर्जी कुणबी ता.खेड, चिपळूण - श्रीम. शितल सत्येंद्र राजे उपशिक्षिका जि. प. पू. प्राथ.आदर्श शाळा गोवळकोट मराठी, ता.चिपळूण, गुहागर- श्रीम. ममता मकरंद विचारे, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जि. प. आंतरराष्ट्रीय शाळा अंजनवेल नं .२ ( कातळवाडी ) ता.गुहागर, संगमेश्वर - श्री. नथुराम शंकर पाचकले पदवीधर शिक्षक, जि. प. पू. प्राथ. शाळा आंबेड बु . नं . २, ता. संगमेश्वर, रत्नागिरी - श्री. विद्याधर लक्ष्मण कांबळे पदवीधर शिक्षक, जि. प. पू. प्राथ. शाळा लाजूळ नं .१, ता. जि.रत्नागिरी, लांजा - श्री. नानासाहेब आप्पा गोरड, पदवीधर शिक्षक, जि. प. आदर्श देवधे क्र .३ ( मणचे ), ता. लांजा, राजापूर - श्री. दिपक रामचंद्र धामापूरकर, पदवीधर शिक्षक, जि. प. पू. प्राथ.आदर्श शाळा सोलगाव नं .२, ता.राजापूर, विशेष पुरस्कार- लांजा - श्री. सुनिल दत्ताराम भोसले, पदवीधर शिक्षक, जि. प. पू. प्राथ. शाळा खानवली नं .३ केंद्र, खानवली बीट पुनस, ता. लांजा.
www.konkantoday.com