समुद्री प्राणी ‘वालरस’ याच्या हस्तिदंत ची तस्करी करण्यासाठी आलेले तिघेजण पोलिसांच्या ताब्यात

वनविभाग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने संयुक्‍तरित्या सापळा रचत दोन सुळे असलेल्या समुद्री प्राणी ‘वालरस’ याच्या हस्तिदंत ची तस्करी करण्यासाठी आलेल्या तिघांना हातखंबा येथे पकडले त्यांच्या ताब्यातील हस्तिदंत आणि इर्टिगा कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई मंगळवार ३१ ऑगस्ट रोजी रात्री ९वा.करण्यात आली. यामध्ये मुहंमद नुमान यासिन नाईक (, रा.कोनाडी कोरगाव, उत्‍तर गोवा), हेमंत सुरेश कांडर (,कणकावली, सिंधुदुर्ग) आणि राजन दयाळ पांगे (, रा.पारवाडी आचरे मालवण, सिंधुदुर्ग) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तीन संशयितांनी नावे आहेत. त्यांच्याविरुध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button