वारंवार सूचना करूनही नेपाळी खलाशांची माहिती न देता मासेमारीला जाणाऱ्या नौकांवर कारवाईचा बडगा उभारला जाणार
मच्छिमारांना त्यांच्या नौकेवरील नेपाळी खलाशांची माहिती मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त आणि पोलिसांना देणे आवश्यक आहे.गेल्या पंधरा दिवसात एकाही मच्छिमाराने नेपाळी खलांशाची माहिती जमा केलेली नाही.आजपासून पर्ससीन नेट मासेमारी सुरू होत असली तरी नेपाळी खलाशांची माहिती न देता मासेमारीला जाणाऱ्या नौकांवर कारवाईचा बडगा उभारला जाणार आहे अशी माहिती मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त एन.व्ही.भादुले यांनी दिली.
नुकतीच जिल्ह्याची सुरक्षेच्या संदर्भात एक बैठक झाली.त्या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मच्छिमार नौकांवरील सर्व नेपाळी खलाशांची पडताळणी करून त्याची संपूर्ण माहिती मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाने पोलिसांना द्यावी अशी सूचना दिल्या आहेत
www.konkantoday.com