
रत्नागिरी शहर बस स्थानकाची दुरवस्था,सिमेंटचे पत्रे तुटून पडले
रत्नागिरी शहर बस स्थानकाची दुरवस्था सध्या शहरी बस स्थानक आहे तिथे पूर्वी ग्रामीण व लांब पल्ल्याच्या एसटी गाड्या सोडण्यात येत होत्या पण गेल्या दोन वर्षांपासून ग्रामीण व लांब पल्ल्याच्या गाड्या रहाटघर स्थानकातून सोडण्यात येतात. शहर स्थानकातून फक्त शहरी वाहतूक सुरू असते पावसाळ्यापासून या स्थानकातील सिमेंटचे पत्रे तुटून गेले आहेत व पावसाचे सर्व पाणी स्थानकात येते त्यामुळे प्रवाशांना फार मोठा त्रास व अडचण होत आहे. नवीन बस स्थानक कधी पूर्ण होईल याची कोणीही खात्री देऊ शकत नाही त्यामुळे प्रवाशांना बाहेर उन्हापावसात उभे राहून गाड्यांची वाट पाहण या पलीकडे कोणताही उपाय नाही जो प्रवाशांना त्रास होत आहे त्याला नक्कीच वाली कोणी नाही. रत्नागिरी जिल्ह्याचे पालक मंत्री अनिल परब हे परिवहन मंत्री असले तरी रत्नागिरी बस स्थानकाला महनावे तसे लक्ष देऊन काम करत नाहीत. रत्नागिरी प्रवासी निमुटपणे सर्व सहन करत आहेत या बाबीकडे परिवहन खात्याने लक्ष ठेवून शहरी बस स्थानकातील उडालेली पत्रे त्वरित दुरुस्त करून प्रवाशांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे .
www.konkantoday.com