रत्नागिरी जिल्ह्यात दि. १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत मातृवंदना सप्ताह
रत्नागिरी जिल्ह्यात दि. १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत मातृवंदना सप्ताह राबविण्यात आला आहे. पात्र लाभार्थ्यांसाठी सप्ताहात विशेष मोहीम राबविण्यात यावी असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिले आहेत.
केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना एकाच वेळी ग्रामीण, शहरी भागात राबविण्यात येणार आहेत. सदर योजनेंतर्गत दि. १ जानेवारी २०१७ रोजी किंवा त्यानंतर ज्या मातांची प्रसूती झाली आहे किंवा गर्भधारणा झाली त्यांनी शासनाने अधिसूचित केलेल्या नोंदणी केली असेल अशा पात्र महिलांना योजनेचा लाभ पहिल्या जिवंत अपत्यासाठी देण्यात येतो. www.konkantoday.com