
श्रीमंत भूषणसिंगराजे होळकर यांचा खेड तालुक्यातील धनगरवाड्यांचा पाहाणी दौरा
खेड तालुक्यातील धनगरवाड्या सह्याद्री पर्वताच्या दुर्गम भागात वसलेल्या असुन स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतरही विकासाच्या मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत.दिनांक 21 व 22 जुलै 2021 रोजी झालेल्या महाअतिवृष्टीत अनेक धनगरवाड्यांवर दरडी कोसळून धनगर बांधवांच्या घरांचे व शेतीचे नुकसान झाले आहे.अनेक धनगर बांधव बेसाहारा झाले आहेत.
खेड तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या धनगर समाज बांधवांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करून समाज बांधवांना आधार देण्याच्या दृष्टीने धनगर समाजाचे आराध्य दैवत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या परिवाराचे 13 वे वंशज श्रीमंत भुषणसिंगराजे होळकर रविवार दिनांक 5 सप्टेंबर 2021 रोजी खेड तालुक्यात येत आहेत. राजे पुढील धनगरवाड्यांना भेटी देऊन आपल्या समाजबांधवांशी सवांद साधणार आहेत.
१) गांव लोटे/गुणदे – तलारीवाडी
२) गांव मिर्ले – धनगरवाडी
३) गांव खोपी – अवकीरेवाडी
४) गांव खोपी – रामजीवाडी
५) गांव आंबवली – बाऊलवाडी
६) गांव सणघर – धनगरवाडी
७) गांव वाडीबीड – धनगरवाडी
श्रीमंत भुषणसिंगराजे होळकर यांच्या दौ-याचे नियोजन महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच,रत्नागिरी तर्फे करण्यात येत आहे.त्याचे आगमन प्रथमच खेड तालुक्यात होत असल्याने संपुर्ण खेड तालुक्यातील समाज बांधव स्वागतासाठी सज्ज आहेत. *रामचंद्र बाबू आखाडे* *जिल्हाध्यक्ष*
महाराणी अहिल्यादेवी समाज
प्रबोधन मंच,रत्नागिरी
संपर्क नं : 9222807942
www.konkantoday.com