
रोशनी फाऊंडेशनने मुस्लिम धर्माला अभिप्रेत असलेली संस्कृती जपली -आ. शेखर निकम
महापुरात सर्व प्रकारचे मदतकार्य करून रोशनी फाऊंडेशनने समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. आज हातावर पोट असणार्या व्यावसायिकांना हातगाडीचे वाटप करून पूरग्रस्त छोट्या व्यावसायिकांना पुन्हा एकदा रोजीरोटीला लावण्याचा प्रयत्न केला आहे. रोशनी फाऊंडेशन आणि मुस्लिम समाजाने मुस्लिम धर्माला अभिप्रेत असलेली संस्कृती जपण्याचे काम केले आहे, अशी प्रतिक्रिया आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केली.
www.konkantoday.com




