वाढदिवसानिमित्त एक नाही दोन नाही तर तब्बल ८०० जणांच्या फोटोचा बॅनर लावला
मोठ्या नेत्याचा वाढदिवस असो की अगदी छोट्या कार्यकर्त्यांचा हल्ली सगळीकडे रस्त्याच्या बाजूला त्यांच्या फोटोसह व समर्थकांच्या फोटोसह आपल्याला बॅनर झळकताना दिसतात
पुणे येथील युवकाने आपल्या वाढदिवसानिमित्त एक नाही दोन नाही तर तब्बल ८०० जणांच्या फोटोचा बॅनर लावला आहे. लहान मुलापासून तर वयोवृद्ध नागरिकांचे फोटो या बॅनरवर लावले आहेतयेथील सामाजिक कार्यकते पराग ढेणे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एनडीए रस्त्यावरील गणपती माथ्याजवळ वाढदिवसाचा बॅनर लावला आहे. याच बॅनरवर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या फोटोमुळे येणाऱ्या – जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.
www.konkantoday.com