
रत्नागिरी शहरातील मनोरुग्णालयात एकाच ठिकाणी २०रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना रत्नागिरी शहरातील मनोरुग्णालयात एकाच ठिकाणी २०रुग्णकोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. या घटनेने आरोग्य यंत्रणेतखळबळ उडाली असून प्रत्येक रुग्ण आणि कर्मचाऱ्यांची तपासणी
करण्यात येणार आहे. जवळपास सर्व रुग्णांचे पहिले लसीकरण पारपडले आहे. या सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून आली असूनत्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. येथील महिला रुग्णालयातया सर्वांवर उपचार सुरू असल्याचे कळते
www.konkantoday.com