रत्नागिरी शहरांमध्ये नगर परिषद मार्फत रस्त्याचे खड्डे बुजवण्याची कामे सुरू,केलेले काम टिकावे अशी नागरिकांची अपेक्षा
रत्नागिरी शहरांमध्ये नगर परिषद मार्फत रस्त्याचे खड्डे बुजवण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत गेल्या दोन दिवसांपासून शहरातील मुख्य रस्त्यावर माळनाका पासून मारुती मंदिर पर्यंत रस्त्याची दुरावस्था झाली होती त्याच्यावरती काही प्रमाणात मलमपट्टी करण्यात येत आहे तसेच कालपासून पावसाचे आगमन झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस लागत आहे तरीही रस्त्याचे काम नगरपरिषद मार्फत चालू आहे खरोखरच हे काम उत्कृष्ट पद्धतीने होईल का याची लोकांच्या मनात शंका आहे.रत्नागिरी शहरातील रामआळी भागात असे काम चालू असता व्यापाऱ्यांनी त्याला रोखले होते तसेच रस्त्याचे काम चालू असताना वाहतूक ही चालू आहे त्यामुळे जे रस्त्यावर ती काम चालू आहे खडीकरणाचे असेल किंवा डांबरीकरण टाकण्याचे त्याला मजबुतीकरण येत नाही जर सतत पाऊस पडत राहिला तर हे घडलेले खड्डे पुन्हा उघडून रस्त्याची दुरवस्था दिसून येईल ही दुरवस्था होऊ नये म्हणून कोणती उपाययोजना नगर परिषद मार्फत होणार आहे का? सध्या तरी पडलेल्या खड्डय़ांची डागडुजी करून नगरपरिषदेने नागरिकांना काहीसा प्रमाणावर दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे
www.konkantoday.com