
निर्बंध व मंदीचा दहीहंडीच्या उत्सवावर परिणाम,छोटे व्यापारी ही अडचणीत
कोरोनाची रुग्णसंख्या आता आटोक्यात येत असली तरी अजुनही कोरोनामुळे घालण्यात आलेल्या निर्बंधाचा व मंदीचा फटका छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना बसत आहे आज सर्वत्र दहीहंडीचा उत्सव आहे पण शासनाच्या नियमाप्रमाणे दहीहंडीचा उत्सव कुठेही दहीहंडी बांधता येणार नसल्यामुळे लोकांमध्ये एक प्रकारची नाराजी आहे आज सकाळपासून रत्नागिरी शहरात फळ विक्रेते, फुल विक्रेते आपली दुकाने लवकर उघडून बसले आहेत फेरीवाले रस्त्याच्या कडेला बसून आपला माल विकताना दिसत आहेत. आमच्या प्रतिनिधीने काही फुल विक्रेते यांची संवाद साधला असता असे दिसून आले की ज्याप्रमाणे लोकांची गर्दी होते त्या प्रमाणात फुले खरेदी करण्याकरता किंवा फळे घेण्याकरिता लोक म्हणावी तशी बाहेर आलेले नाहीत काही विक्रेते तर कोल्हापुरातुन फुल विक्री करण्याकरिता रत्नागिरी शहरांमध्ये आलेले आहेत परंतु लोकांकडून खरेदी होत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी दिसून येते. रंगीबेरंगी हंडी घेऊन आलेल्या विक्रेते गेल्या चार दिवसापासून आपला व्यवसाय आज होईल या आशेने बसून आहेत परंतु आज सकाळी अजुनही त्यांची भवानी झालेले नाही
www.konkantoday.com
पहा व्हीडीयो👇🏻