
पुढील चार दिवसांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पावसाची शक्यता
राज्याच्या बहुतांश भागांत दीर्घ ओढ दिलेला पाऊस पोषक वातावरणामुळे पुन्हा सक्रिय होणार आहे. पुढील चार दिवसांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पावसाची शक्यता आहे.कोकण विभागात मुंबई, ठाण्यासह तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कमी पाऊस झालेल्या उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज आहे, तर विदर्भाच्या काही भागांत रविवारी जोरदार सरी कोसळल्या.
www.konkantoday.com