गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करणार -अण्णा हजारे
समाजाच्या भल्याकडे न पाहता सरकार केवळ पैशाकडे पहात आहे. त्याच कारणातून सरकारने गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठविली. याला राज्यभरातून सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध करणे गरजेचे होते, मात्र तसे झाले नाही. आता आम्हीच याविरोधात उच्च न्यायालयात लवकरच याचिका दाखल करणार आहोत, अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली.
www.konkantoday.com