
रत्नागिरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शहर अध्यक्ष म्हणून मीच अजून अधिकृतरित्या पदावर असल्याचा अभिजित उर्फ मनुशेठ गुरव यांचा खुलासा, मी राजीनामा दिलेला नाही
रत्नागिरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष श्री. अभिजीत उर्फ मनुशेठ गुरव यांनी रत्नागिरीचा शहर अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नगरपालीका निवडणूकीच्या तयारीला लागली असुन रत्नागिरी शहरामध्ये कार्यकर्त्यांबरोबर बैठका घ्यायला सुरुवात केली असल्याचे सांगितले. शहर अध्यक्ष पदाबाबत विचारले आसता शहर अध्यक्ष म्हणून मी राजीनामा दिलेला नाही आणि पक्षाच्या घटनेनुसार तशी प्रक्रीयासुध्दा झालेली नसल्याचे शहर अध्यक्ष श्री. अभीजीत उर्फ मनुशेठ गुरव यांनी सांगितले. शहर अध्यक्ष पदाचा मी जर राजिनामा दिला असता तर तो पक्ष प्रमुखांकडून मंजुर करुन घ्यावा लागतो त्यानंतर रितसर प्रदेश कार्यालयाकडून सदर शहर अध्यक्ष निवड प्रकीयेसाठी नेमलेले निरिक्षक येऊन तशी बैठक लावून कार्यकर्त्यांचे मत घेऊन तसा निर्णय दिला जातो. रत्नागिरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष श्री. अभिजित उर्फ मनुशेठ गुरव यांनी सांगितले की घटनेनुसार काहीही इथे झालेले नाही ज्या प्रमाणे राजकारणामध्ये एखाद्या कार्यकर्त्याला पक्षामध्ये प्रवेश घेतेवेळी त्यांने काही अट ठेवली असेल तर त्यासाठी त्याचा पक्षामध्ये प्रवेश करून घेण्यासाठी राजकीय खेळी खेळली जाते त्या कार्यकर्त्याला तात्पुरत्या स्वरुपाचे तसे सांगितले जाते त्याप्रमाणे माझ्या नेत्यांकडून सांगितले गेले असल्याचे शहर अध्यक्ष श्री. अभीजित उर्फ मनुशेठ गुरव यांनी सांगितले. 2016 र.न.प. निवडणूकीच्या वेळेस पक्षाने त्यांना उमेदवारी न दिल्या कारणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून ते शिवसेनेमध्ये गेले होते मागाहून त्यांचा शिवसेनेत भ्रमनिरास झाल्या कारणाने ते पुंन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याची तयारी दाखवली. 2019 च्या विधानसभा निवडणूकिच्यावेळी आमचे लाडके धडाडीचे उमेदवार श्री. सुदेशजी मयेकर यांनी निलेश भोसले यांना पक्षामध्ये परत घेण्यासाठी जेणेकरुण त्याच्यामुळे २-४ मतांचा फायद होईल असे बेरजेचे गणीत केले गेले आणि आम्ही राजकीय खेळी त्यावेळी खेळून गेलो.
रत्नागिरी शहरातील सर्व वार्डमध्ये केलेल्या बुथ कमीट्या ह्या माझ्या नेतृत्वाखाली झालेल्या असुन शहराची कार्यकारणी मीच केलेली आहे. रत्नागिरी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे आजही माझ्याच संपर्कात असुन त्यांची कामे माझ्या मार्फतच होत आहेत. रत्नागिरी शहरामध्ये अध्यक्ष झाल्यापासुन अनेक सामाजिक तसेच सांस्कृतीक कार्यक्रम मी राबवीत आहे त्यामध्ये प्रामुख्याने दरवर्षी रत्नागिरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे दहीहंडीचा कार्यक्रम आणि पक्षप्रमुख आदरणिय शरदचंद्रची पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कब्बडी स्पर्धा माझ्या नेतृत्वाखाली भरवली जाते.
तथाकथीत रत्नागिरीचे शहर अध्यक्ष श्री. निलेश भोसले हे स्वता:ला शहर अध्यक्ष म्हणवून घेत आहेत त्यांनी पक्षाच्या घटनेप्रमाणे मी शहर अध्यक्ष झालो आहे असे दाखवुन द्यावे. श्री. निलेश भोसले यांनी जर आता शहर अध्यक्ष म्हणून कार्यकारीणी पाठवली असेल तर ती घटनेप्रमाणे बोगस असून त्याला सहकार्य करणा-यांवर पक्षश्रेष्टींकडे कार्यवाही करण्याची आम्ही रत्नागिरी शहरातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते, नगरसेवक, पदाधीकारी आणि कार्यकर्ते मागणी करणार असल्याचे शहर अध्यक्ष श्री. अभिजीत उर्फ मनुशेठ गुरव यांनी सांगितले.
रत्नागिरी नगरपालीकेमध्ये इच्छुक नगरसेवक उमेदवाराला ज्याप्रमाणे स्विकृत नगरसेवकाचे अमिश दाखवले जाते त्याप्रमाणे शहर अध्यक्ष पदासाठी काही नेत्यांकडून बोलण्यात आले होते त्याप्रमाणे आमचे स्थानिक नेते राजकीय खेळी खेळले आणी तशी कुठेही नोंद नाही असे शहर अध्यक्ष श्री. अभीजीत उर्फ मनुशेठ गुरव यांनी सांगितले. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने निष्ठावन कार्यकरर्ते असुन इकडून तिकडे फीरणा-यांपैकी नाही आणि म्हणून मलाही खात्री आहे की तशीच जर वेळ आली तर शहरातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधीकारी आणि कार्यकर्ते तसेच पक्षश्रेष्ठी सुध्दा माझ्याबाजुनेच निर्णय घेतील असे शहर अध्यक्ष अभिजीत उर्फ मनुशेठ गुरव यांनी सांगितले.
रत्नागिरी नगरपरिषद निवडणूकीच्या तयारी बाबत विचारले असता तयारी सुरु झाली आहे तसेच सर्व वॉर्डमधील कार्यकर्ते आणि पदाधिकारी याच्या बरोबर बैठका सुरु झाल्या असुन नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे सांगण्यात आले आहे. लवकरच जेष्ठ नेते मा. श्री. राजाभाऊ लिमये, माजी उपनगराध्यक्ष आणि प्रांतिक सदस्य मा. श्री. बशिरभाई मुर्तुझा आणि पक्षप्रतोद, नगरसेवक आणि २०१९ चे विधानसभा उमेदवार मा. श्री. सुदेशजी मयेकर आदि नेते यांच्या नेतृत्वाखाली शहरातील वॉर्डचे प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची बैठक आयोजीत करण्यात येणार असल्याचे शहर अध्यक्ष श्री. अभिजीत उर्फ मनुशेठ गुरव यांनी सांगितले.
www.konkantoday.com