
भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिला रौप्य पदक मिळण्याची शक्यता
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगाट 50 किलो वजन गटात फायनलमध्ये प्रवेश केल्यावर अपात्र ठरवण्यात आलं होतं. फायनल सामन्याआधी विनेश फोगाटचे वजन 100 ग्रॅमने जास्त असल्याने तिला अपात्र करण्यात आलं.या निर्णयामुळे सर्व भारतीयांना धक्का बसला होता. संघर्ष करत फायनल गाठलेल्या विनेशनेही कुस्तीमधून निवृत्तीची घोषणी केली. अशातच सर्व भारतीयांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.विनेश फोगाटने फायनलसाठी अपात्र करण्याच्या आयओसीच्या निर्णयाला क्रीडा लवादाच्या न्यायालयात (CAS) आव्हान दिलं आहे. विनेशने अपील केलं असून फायनल सामना किंवा संयुक्त रौप्य पदक द्यावे, असं आवाहन केले गेले होते. अशातच विनेश फोगाटचे हे अपील मान्य केल्याची माहिती समजत आहे. याबाबत CAS लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे.