आमच्यात केवळ ओबीसी आरक्षणाबाबतच चर्चा झाली – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या काल बंद दाराआड काही वेळ चर्चा झाली. या बंद दाराआड चर्चेवरून राज्यात राजकीय चर्चा जोरदार रंगू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना याबाबत माहिती देत, स्पष्टीकरण दिलं आहे.आमच्यात केवळ ओबीसी आरक्षणाबाबतच चर्चा झाली, अन्य कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झालेली नाही. असं फडणवीसांनी सांगितलं आहे.
www.konkantoday.com