रस्त्यावरील जखमी झालेल्या गायीला दिले जीवदान तब्बल साडेतीन तास पावसात भिजून तरुणांनी गायीला दिले जीवदान
तरी सदरील वृत्त असे की शुक्रवार दि.२७ आँगस्ट २०२१ रोजी रात्री ०९.३० वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी नगर मजगाव रोड येथे काही गुर रस्त्यावर बसून होती. दरम्यान विमानतळहुन रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या अज्ञात चार चाकी वाहनाने यापैकी बसलेल्या एका गायीच्या पायावरून गाडी भरधाव वेगानं नेऊन तो वाहन चालक फरार झाला आणि गाय जखमी अवस्थेत तिकडेचं पडून होती दरम्यान शेजारीच राहणारे सचिन कदम यांना ही बाब समजली असता त्यांनी तात्काळ गुंदेजा शेठ यांना फोन करून सदर बाब कानावर घातली, आणि गायीचे प्राण वाचण्यासाठी धावाधाव केली. दरम्यान गायीच्या उजव्या साईड चे मागील पुढील दोन्ही पायांना मोठी दुखापत झालेली लक्षात येताच तात्काळ जनावरांनचे डॉक्टरांना बोलावण्यात आले, दरम्यान शुभम वरेकर यांनी ही बाब त्यांच्या श्री महापुरुष मित्रमंडळात कळवताच सामाजिक बांधिलकी जपत नावारूपाला आलेल्या श्री महापुरुष मित्रांडळाचे सर्व तरुण कार्यकर्ते याठिकाणी जमा झाले, डॉक्टरांच्या मदतीने, रोहन वरेकर, सचिन कदम, सुमित कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली त्या गायीवर तेथेच पाऊस पडत असताना गायीवर ताडपत्री धरून तेथेच तिच्या दोन्ही पायांना प्लास्टर करण्यात आले, तब्बल साडेतीन तास अथक प्रयत्नांची पराकाष्ठा करत सर्व तरुणांनी या गायीला वाचविण्यात महत्ववाचे योगदान दिले. यामध्ये लक्ष्मीनगर येथे राहणारे कदम बंधू सचिन कदम, सुमित कदम, बंडू गावखडकर, तसेच इतर सहकारी होते, श्री महापुरुष मित्रमंडळाच्या वतीने रोहन वरेकर, शुभम वरेकर, ओंकार रजपूत, सूरज रजपूत, पराशर महाकाळ, प्रेम महाकाळ, चैतन्य ईपते, विराज कुमठेकर, संजू रजपूत, दादू किडये, संजोग म्हेतर, ओंकार म्हेतर या सर्व कार्यकर्त्यांनी तिच्यावर उपचार झाल्यानंतर रिलायन्स मॉल च्या मागील बाजूस असणाऱ्या गुंदेजा शेठ यांचा गोठ्यात नेऊन सोडण्यात आले. गायीचा जीव वाचवल्याबद्दल वेगळेच समाधान वाटत असल्याचे या तरुणांकडून सांगण्यात आले. दरम्यान रात्री वाहने चालवताना सावकाश चालवावी आणि अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी काळजी घेण्यात यावी असे मत या सर्व तरुणांनी वाहनधारकांसाठी मांडले.