रत्नागिरीत जनआशीर्वाद यात्रेत चोरट्यानी केली हात की सफाई,काही नेत्यांना बसला फटका
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने रत्नागिरीत मारुती मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ भाजप कार्यकर्त्यांनी मोठे जल्लोषात स्वागत केले राणेंच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली होती याचा फायदा घेत अनोळख्या चोरट्यांनी काही कार्यकर्त्यांच्या सोन्याच्या चेन व पाकिटे हात की सफाई करत लंपास केल्याचे वृत्त आहे याचा फटका भाजपच्या काही नेत्यांनाही बसल्याचे कळते काही दिवसांपूर्वी ठाण्याच्या जनआशीर्वाद यात्रेतही असाच प्रकार घडला होता त्यावेळी पक्षाचे मफलर घालून चोरट्यांनी हात की सफाई केली होती व अनेकांची पाकिटे लांबविली होती मात्र तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करून या टोळक्याला अटक केली होती
www.konkantoday.com