पगार घेण्यासाठी आलेल्या महिला कर्मचाऱ्याने मोबाइल लांबवला
चिपळूण शहरातील विठाई हॉस्पिटलच्या रिसेप्शन काऊंटरवर ठेवलेला फिर्यादी नागेश वाघमारे यांचा मोबाइल लांबवल्याप्रकरणी रश्मी पवार राहणार तुरंबव चिपळूण यांच्याविरूध्द चिपळूण स्थानकात तक्रार दाखल करण्यात आला आहे यातील आरोपी रश्मी पवार ही आपला पाच दिवसांचा पगार घेण्याकरिता हॉस्पिटलमध्ये आली होती तिने आपला पगार घेतल्यानंतर ती हॉस्पिटलमध्ये निघून गेली मात्र त्या वेळी फिर्यादी वाघमारे यांचा काऊंटरवर ठेवलेला मोबाईल तिने लबाडीने चोरून नेल्याची फिर्याद पोलीस स्थानकात करण्यात आली आहे
www.konkantoday.com