जनआशीर्वाद यात्रेत चोरट्यानी केलेल्या हातसफाई बाबत तक्रार दाखल,२लाख ४१हजारांचा ऐवज लंपास
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या काल जनआशीर्वाद यात्रेच्या दरम्यान मारुती मंदिर सर्कल येथे मोठ्या प्रमाणावर भाजप कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती या गर्दीचा फायदा घेत चोरट्यानी चांगलीच हातसफाई केली अज्ञात चोरट्यानी चारजणांच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवल्याची तक्रार दाखल झाली आहे याबाबत भाजपचे नेते सुशांत चंवडे यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार मारुती मंदिर जन यात्रेच्यागर्दीच्या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी सुशांत चवंडे यांच्या गळ्यातील नव्वद हजार रुपये किमतीची सोन्याची चैन ,सुरेंद्र भाटकर यांच्या गळ्यातील ऐंशी हजारांची चैन ,विष्णू पवार यांच्या गळ्यातील सेहेचाळीस हजारांची सोन्याची चेन,व रामदास शेलटकर यांच्या गळ्यातील पंचवीस हजारांची सोन्याची चेन व रोख रक्कम अज्ञात चोरट्यानी लांबवल्याची तक्रार रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात करण्यात आली असून याबाबत आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे
www.konkantoday.com