विमानतळासाठी संपादित करण्यात येणार्‍या जागेला चांगला दर मिळावा यासाठी प्रयत्न करणार – मंत्री उदय सामंत

विमाने उतरण्यासाठी रत्नागिरीतील विमानतळ पुरेसे आहे. मात्र विमानांच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाही. ही जागा ताब्यात येईपर्यंत काही जागा भाडेतत्त्वावर घेण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.अजून ५० एकर जागेची त्यासाठी गरज असून, खास बाब म्हणून त्याला अधिक दर मिळावा, असा प्रस्ताव संबंधितांकडे पाठवण्यात आला असल्याचेही ते म्हणाले.विमानतळाच्या धावपट्टीचे काम पूर्णत्त्वाला गेले आहे. येथे विमान उतरू शकते. मात्र विमानाच्या पार्किंगसाठी अधिक जागेची गरज आहे. सध्या पाच हजार रुपये गुंठा इतका दर दिला जात आहे. तो खूपच कमी आहे. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी दीपक कपूर यांच्याशी आपले बोलणे झाले आहे. खास बाब म्हणून जागेचा अधिक मोबदला देण्याचा प्रस्ताव आपण पाठवत आहोत. त्याला नक्की मंजुरी मिळेल. अर्थात ही सर्व प्रक्रिया होईपर्यंत विमानतळाचे काम अडू नये, यासाठी काही जागा भाडेतत्त्वावर घेण्याचा विचार सुरू आहे, असे ते म्हणाले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button