
*खेड राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन*
_राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) येथील पदाधिकार्यांनी सामान्य जनतेला दररोज भेडसावणार्या समस्यांबाबत तहसीलदार सुधीर सोनवणे यांना शासनाच्या विरोधातील गुरूवारी निवेदन देत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.राज्यातील सर्व भरती प्रक्रिया एमपीएसीमार्फत राबविण्यासाठी राज्यसेवा आयोग सक्षम करण्यात यावा, असंघटीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवकांसाठी रि-स्किलिंग अप स्किलिंग कार्यक्रम राबवणे, वाढत्या महागाईचा विचार करत सर्व सामाजिक सहाय्य योजना, घरकुल योजनांसह शासकीय अनुदानाच्या सर्वच योजनांचे अनुदान व या योजनांसाठी असलेली उत्पन्न मर्यादा वाढवण्यात यावी, शासनाकडून घोषित केलेली आर्थिक, सामाजिक, महामंडळे कार्यान्वित करावीत आदी मागण्यांचा समावेश आहे. www.konkantoday.com




