मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून आरोग्य केंद्र वाटद खंडाळा येथे नवीन अँम्बुलन्स

शिवसेना उपनेते,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.ना.उदयजी सामंत ,शिवसेना तालुका प्रमुख मा.बंड्याशेठ साळवी व उद्योजक .किरणशेठ सामंत यांच्या विशेष प्रयत्नांमुळे प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद खंडाळा येथे नवीन अँम्बुलन्स मिळाली,त्या अँम्बुलन्सचे लोकार्पण मा.समाजकल्याण सभापती सौ.ऋतुजा जाधव,विद्यमान पंचायत समिती सभापती सौ.संजना माने व वाटद ग्रामपंचायत सरपंच सौ.अंजली विभूते यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी वाटद शिवसेना जि.प. गटाचे सन्मा. विभागप्रमुख श्रीबाबयशेठ कल्याणकर, विभागसंघटक श्री. उदयजी माने, जयगड सरपंच सौ. फरजाना डांगे, शाखाप्रमुख .नारायणशेठ काताळकर , माजी सरपंच जयगड ज्येष्ठ शिवसैनिक . अनिरुद्ध साळवी. पत्रकार उदयजी महाकाळ, उद्योजक अस्लम डांगे, ज्येष्ठ शिवसैनिक श्री. सुनील ऊर्फ भाई जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ.कु.श्रृती कदम, डॉ.कु.व्हटकर, सर्व वैद्यकीय स्टाफ आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती वाटद जिल्हा परिषद मतदार संघातील सर्वसामान्य जनतेसाठी रुग्णवाहिकेची नितांत गरज होती या बाबतीत शिवसेनेच्या पंचायत समितीच्या सभापती सौ. संजनाताई उदय माने, जिल्हा परिषद सदस्या सौ. ऋतुजा ताई जाधव, पंचायत समिती सदस्या सौ. मेघनाताई पाष्टे आदींनी जोरदार प्रयत्न केले. यासर्वांच्या प्रयत्नांना यश येवून आज नवीकोरी अद्ययावत रुग्णवाहिका जयगड, वाटद परिसराला प्राप्त झाली समर्पित भावनेने रुग्ण सेवा करणारे वाटद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व कर्मचाऱ्यांना एक मदतीचा, मजबूत हात या सुविधेमुळे प्राप्त झाला आहे..
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button