राणे यांचे बॅनर फाडल्याप्रकरणी आमदार राजन साळवी यांचे सह शिवसेना पदाधिकाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल
जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर फाडून सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजीही केल्याबद्दल शिवसेना आमदार राजन साळवी ,संजय साळवी, परेश खातु प्रसाद सावंत, प्रकाश सावंत व प्रशांत साळुंखे व अनोळखी आठ ते दहा शिवसेना पक्षाचे पदाधिकारी यांच्याविरूध्द शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
जिल्हाधिकार्यांचा मनाई आदेश असतानादेखील वरील शिवसेना पदाधिकारी यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने लावलेले बॅनर फाडून टाकणे व सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी करणे पाच किंवा जास्त इसमाना परवानगी नसताना एकत्र येणे व कोरोना संसर्गाची शक्यता असताना विनापरवाना एकत्र येणे आदी कारणावरून आमदार साळवी व अन्य पदाधिकाऱ्यांनी यांच्याविरुध्द पोलिसां कडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com