विनायक राऊत यांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ला
विनायक राऊत यांच्या सिंधुदुर्गातील घरावर सोडा बॉटल फेकल्याचा प्रकार घडला आहे . चार अज्ञात बाईकस्वारांनी विनायक राऊत यांच्या सिंधुदुर्गातील तळगाव इथल्या बंगल्यावर सोडा बॉटल फेकल्याची माहिती मिळतेय. सोडा बॉटल फेकल्यानंतर हे चौघेही पळून गेले आहेत. दरम्यान, या हल्ल्यात राऊत यांच्या बंगल्याचं कुठलंही नुकसान झालेलं वृत्त नाही. विनायक राऊत यांच्या बंगल्यावर पोलिसांचा बंदोबस्त असताना हल्ला झाल्याचं समजतेय. विनायक राऊत यांच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. विनायक राऊत यांच्यावर झालेला हा हल्ला राणे समर्थकांनी केला असल्याचा आरोप, शिवसैनिकांनी केला आहे.
www.konkantoday.com