केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांना जामीन मंजूर
महाड: केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांनाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी त्यांना मंगळवारी दुपारी संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथे अटक केली. अटक केल्यानंतर त्यांना महाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. महाड पोलिसांनी त्यांना महाड कोर्टात हजर केले असता त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून न्यायाधीशानी रात्री दहा वाजता हा निकाल जाहीर केला. केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केल्यानंतर महाड पोलिसांनी त्यांना महाडमध्ये नेले. येथे त्यांची वैद्यकीय तपासणी डॉक्टर जगताप यांनी केली. त्यानंतर रात्री त्यांना महाड न्यायालयात हजर करण्यात आले. नारायण राणे यांचे वकील अॅड. निकम यांनी ना. राणेंच्या बाजूने युक्तिवाद केला. कसल्याही प्रकारची लेखी सूचना न देता ना. राणे यांना अटक करण्यात आली, असा महत्त्वाचा मुद्दाही त्यांनी मांडला. अखेर महाड कोर्टाने त्यांना दिलासा दिला आहे. नारायण राणे यांचा जामीन मंजूर झाला आहे. पोलिसांनी नारायण राणे यांना पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली होती. परंतु पोलीस कोठडी देण्याची गरज नाही, असे कोर्टाने सांगितले. नारायण राणे यांना जामीन मंजूर झाल्याने भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात आहे.
www.konkantoday.com