
रत्नागिरी जि.प.ला १८१ कोटींचा फटका
जुलै महिन्याच्या दुसर्या पंधरवड्यानंतर झालेल्या अतिवृष्टीने रत्नागिरी जिल्ह्याला मोठा फटका बसला असून, जिल्हा परिषदेचे १८१ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अंतिम अहवाल तयार झाला असून तात्पुरत्या दुरूस्तीसाठी २२ कोटी २२ लाख रुपयांची आवश्यकता आहे. तसा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे.
www.konkantoday.com