कोकणातील डोंगरांचा ड्रोनद्वारे होणार सर्व्हे
सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्राच्यामध्ये वसलेल्या कोकणात दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. तळीयेमध्ये दरड कोसळल्याने ८० जणांचा बळी गेला तर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पोसरे येथे दरड कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर कोकणातील डोंगरांचा ड्रोनद्वारे सर्व्हे केला जाईल, अशी माहिती कोकण विभागाचे आयुक्त विलास पाटील यांनी दिली.
www.konkantoday.com