
मंत्रालयाबाहेर शुक्रवारी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणार्या सुभाष जाधव या शेतक र्यांचे निधन
मंत्रालयाबाहेर शुक्रवारी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणार्या सुभाष जाधव (वय 50, रा. जाधववाडी रांजणी, ता.आंबेगाव जि. पुणे) या शेतकर्याचा रविवारी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. जाधव यांच्यावर मुंबईतील जी.टी. रुग्णालयात उपचार सुरू होते.
जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांना पाच दिवसांपूर्वी पत्र लिहून सावकारांनी जमीन लुबाडल्याची कैफियत मांडली होती. मात्र, त्यांची तत्काळ दखल न घेतल्याने त्यानंतर तीन दिवसांत मंत्रालयासमोर विष प्राशन केले होते.
www.konkantoday.com