
रत्नागिरी शहरात पेट्रोल व दूध टंचाईची शक्यता
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर मिरज येथे अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पाणी भरले आहे त्यातच आंबा घाटातील रस्त्याला चिरा पडल्यामुळे सध्या वाहतूक थांबवण्यात आली आहे रत्नागिरीतील पेट्रोल पंपासाठी लागणारे पेट्रोल डिझेल मिरज येथून टँकरद्वारे येत असल्यामुळे सध्या तेथील पूरस्थितीमुळे त्याच्या वितरणावर परिणाम होणार आहे यामुळे शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलचा साठा संपल्यानंतर पेट्रोल व डिझेलची टंचाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे याशिवाय रत्नागिरी शहराला येणारे दूध कोल्हापूर आधी भागातून येथे येत असल्यामुळे जर आंबाघाट लवकर सुरू झाला नाही तर दूध वितरणावर देखील परिणाम होणार आहे आंबा घाटातून निदान एक मार्गी तरी वाहतूक सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
www.konkantoday.com