केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, शिवसेना खासदार विनायक राऊत
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बैल म्हटले, हा पंतप्रधानपदाचा अपमान आहे. त्यामुळे रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, असे वक्तव्य शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केले.भाजपच्या नेत्यांना सत्तेची मस्ती आली आहे. या मस्तीमध्ये भाजपच्या नेत्यांची विकृती दिसून येते. राजकीय नेत्याचा ‘सांड’ असा उल्लेख करणे दानवे गुरुजींची बुद्धी भ्रष्ट झाल्याचं लक्षण आहे. याची दखल नरेंद्र मोदी यांनी घ्यावी. मोदी यांना बैल म्हणणे म्हणजे त्यांचा अवमान करण्यासारखा आहे. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही विनायक राऊत यांनी केली.
www.konkantoday.com