
गणेश चतुर्थी, गौरी विसर्जन व अनंत चतुर्दशी ला देशी / विदेशी मद्य व माडी विक्री बंद
*रत्नागिरी, : श्री गणेश चतुर्थी (दि. १९ सप्टेंबर), ज्येष्ठा गौरी विसर्जन ( दि. २३ सप्टेंबर), अनंत चतुर्दशी (दि. २८ सप्टेंबर) या तीनही दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व देशी / विदेशी मद्य व माडी विक्री अनुज्ञप्ती संपूर्ण दिवस बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.
सन २०२३ या वर्षात दि. १९ सप्टेंबर ते दि. २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने, मुंबई मद्य निषेध अधिनियम १९४९ चे कलम १४२ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन, जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी श्री गणेश चतुर्थी (दि. १९ सप्टेंबर), ज्येष्ठा गौरी विसर्जन( दि. २३ सप्टेंबर), अनंत चतुर्दशी (दि. २८ सप्टेंबर) या तीनही दिवशी जिल्ह्यातील सर्व देशी / विदेशी मद्य व माडी विक्री अनुज्ञप्ती संपुर्ण दिवस बंद राहतील, असे आदेश दिले आहेत.
या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून यामध्ये कसूर केल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांविरुध्द मुंबई मद्य निषेध अधिनियम, १९४९ मधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
www.konkantoday.com