मराठा समाजाच्या वतीने होणार ना. नारायण राणे यांचा भव्य सत्कार
रत्नागिरी । प्रतिनिधी
जनआशिर्वाद यात्रेच्या निमित्तानं 24 ऑगस्ट रोजी रत्नागिरीत येत असलेल्या केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांचा भव्य सत्कार मराठा समाजाच्या वतीने रत्नागिरीमध्ये करण्यात येणार आहे.
मराठा समाजाच्या अडचणी, समस्या आणि वस्तुस्थिती जाणून आर्थिक स्तरावर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी ना. राणे यांनी राणे समितीचं अध्यक्षपद भूषवलं होतं. मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी सातत्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पाठपुरावा केला असून मराठा समाजाच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले आहेत. ना. राणे यांनी नुकतीच केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रिपदी शपथ घेतली आहे. कॅबिनेट मंत्री पद स्वीकारल्यानंतर ना. राणे प्रथमच रत्नागिरीच्या दौऱ्यावर येत आहेत. त्या निमित्तानं समस्त सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
हा सत्कार सोहळा मंगळवार दि. 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता रत्नागिरी शहरातील मराठा मराठा भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी समस्त मराठा बांधवांनी या सोहळ्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन समस्त सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
www.konkantoday.com