जिल्ह्याच्या मासळी उत्पादनामध्ये गेल्या सात वर्षांत ५० टक्क्यांनी घट

वेगवेगळ्या पद्धतीच्या मासेमारीचे वाढलेले प्रमाण, वादळी वातावरण आणि समुद्रातील प्रदूषण यामुळे जिल्ह्याच्या मासळी उत्पादनामध्ये गेल्या सात वर्षांत ५० टक्क्यांनी घट झाली आहे.सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात मासळीचे उत्पादन ६५,३७४ मेट्रिक टन झाले आहे. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात हेच उत्पादन १,१५,०४२ मेट्रिक टन इतके होते. दरवर्षी होत असलेली ही घट मच्छिमारांसाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे मासेमारी व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला असून, मच्छिमार कर्जबाजारी झाल्याने त्यांच्यासमोर भवितव्याचा प्रश्न उभा राहिला आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला १६७ किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे. या क्षेत्रात १३ मासेमारी केंद्रे असून, किनाऱ्यावर असलेल्या १०४ गावांमध्ये बहुसंख्य मच्छिमार लोकच राहतात. जिल्ह्यात सन २००३ च्या गणनेनुसार मच्छिमारांची संख्या ६७,६१५ आहे. जिल्ह्यात ३,०७७ यांत्रिकी नौका, ४४२ बिगर यांत्रिकी नौका, ४६ मासळी उतरविण्याची केंद्रे, ८५ मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था, ३४ बर्फ कारखाने आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button