जिल्हा परिषद शाळांमधील घटती पटसंख्या हा चिंतेचा विषय
जिल्हा परिषद शाळांमधील घटती पटसंख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. जिल्ह्यात १ हजार ३८५ शाळा २० पेक्षा कमी पटाच्या आहेत. नोकरीसह पाल्यांच्या शिक्षणासाठी गावातून शहराकडे येणार्यांचा कल वाढू लागला असून शहराजवळील गावातील प्राथमिक शाळांचा पट कमी होत असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी संख्या नेमकी का घटते हा अभ्यासाचा विषय बनू लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अडीच हजार शाळा आहेत. मागील दोन वर्षात तीस पटांच्या शाळांची संख्या तेराशे ते चौदाशेच्या दरम्यान राहिल्या आहेत. www.konkantoday.com