चिपळुणात अलोरे, नागावे, पोफळी आणि पेढांबे येथील नळपाणी योजनेला गढूळ पाणी
कोयना आणि कोळकेवाडी धरणातील पाणी गढूळ झाल्याने या धरणावर आधारित असलेल्या अलोरे, नागावे, पोफळी आणि पेढांबे येथील नळपाणी योजनेला गढूळ पाणी येत आहे. पावसाळ्यात नैसर्गिक झरे प्रभावित झाले आहेत. यावर या परिसरातील ग्रामस्थांना अवलंबून रहावे लागत आहे.
चित्तूरमध्ये महापूर आला त्याच दिवशी कोयनानगर नवजानजीक मोठा डोंगराळ भूभाग रस्त्यावर येवून जवळच असलेल्या कोयना धरणात माती गेल्याने संपूर्ण शिवसागर गढूळ झाला. तेथूनच पोफळी व कोळकेवाडी येथे होणार्या वीजनिर्मितीचे इंटेक टनेल असल्याने वीजनिर्मितीला येणारे पाणी गढूळ आले शिवाय चौथ्या टप्प्यातून वीजनिर्मितीचे पाणी ज्या बोगद्यातून बाहेर पडते त्या ठिकाणी कोळकेवाडी येथे असाच डोंगर खचल्याने कोळकेवाडी धरणातील पाणी गढूळ झाले आहे.
www.konkantoday.com