१० महिन्यापुर्वी झालेल्या चोरीचा छडा लावण्यात खेड पोलिसांना यश

कोकण रेल्वेच्या मार्गावरील नातूनगर येथील बोगद्याचे विद्यूतीकरणाचे काम सुरू असतानाच आरोपीत १) विक्रम सायस वाघमारे वय ३८, २) अक्षय मारूती मदने वय २४, ३) आकाश गणपती भालेराव वय २४ रा. रायका, ता. शिरूर, अनंतमाळ, जि लातूर यांना पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुजीत गडदे, पोलीस हवालदार प्रकाश मोरे, पोलीस हवालदार आलीम शेख, पोलीस शिपाई संभाजी मोरपडवार यांच्या पथकाने लातूर येथे दाखल होत. आरोपींच्या मुसक्या आवळण्याची यशस्वी कामगिरी करून. १० महिन्यापुर्वी झालेल्या चोरीचा छडा लावण्यात यश मिळवले. ही घटना दि १५ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते दि १८ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी जोगीनेगी यांनी येथील पोलीसात फिर्याद दाखल केली होती. त्याप्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर 225/2020 मध्ये भादवि 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
श्रीनिवासराव गोपाळकृष्ण योगाने वय ५४ रा मिरजोळी ता.जि रत्नागिरी यांनी चोरी प्रकरणी आरोपीत यांना कोरेच्या मार्गावरील नातूनगर येथील बोगद्याचे विद्यूतिकरणाचे काम सुरू असताना यांना कामावर ठेवले होते. परंतू आरोपीत यांनी फिर्यादीचा विश्वासघात करून. एकमेकांच्या संगनमताने १ लाख ३१ हजार ५०० /- रूपयाचा २ ड्रील मशीन, ब्रोकर, गाईंडर, २ ड्रील बीट असा ऐवज वरील आरोपीत यांनी चोरल्याची घटना घडली. या चोरी प्रकरणी आरोपींच्या नातेवाईकांनी देखील सहकार्य केले नाही. अशाही परिस्थितीत तपास पथकाने कसब, कौशल्यपणाला लावून स्थानिक पोलीसांची मदत घेत. आरोपींच्य मुसक्या आवळण्यास यश मिळवले. या यशस्वी कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक मोहीतकुमार गर्ग, डिवायएसपी शशिकिरण काशिद, पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या गुन्ह्य़ाचा अधिक तपास पोलीस हवालदार आलीम शेख करीत आहेत
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button