
जैतापूर अणुउर्जा प्रकल्पात मनसे सुरक्षा रक्षक युनिटची स्थापना
राजापूर येथे प्रस्तावित असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पामधील सुरक्षा रक्षकांनी मनसे सुरक्षारक्षक सेनेच्या युनिटची स्थापना केली. मनसेचे कामगार सेना अध्यक्ष मनोज चव्हाण आणि सुरक्षा रक्षक सेना अध्यक्ष नंदकिशोर तळावडेकर, जिल्हा चिटणीस अरविंद मालाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे युनिट स्थापन केले. येथील युनिटच्या फलकाचे अनावरण जनहित कक्षाचे सरचिटणीस सुनिल शिर्सेकर, कामगार सेना चिटणीस अनिरूद्ध उर्फ छोटू खामकर यांच्या हस्ते करण्यात आले असे मालाडकर यानी. या प्रकल्पामधून ज्या सुरक्षा रक्षकांना अन्यायकारकरित्या कामावरून कमी केले आहे त्यांना जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाला पुन्हा सेवेत रूजू करून घेण्यास भाग पाडू, अधिकार्यांना मनमानी कारभार स्थानिकांवर अन्याय करू देणार नाही. www.konkantoday.com