
राज्यातील पंधरा भूविकास बँकातील शेतकऱ्यांचे कर्ज व कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमेसाठी ५५० कोटी रुपयांची तरतूद,शेतकऱ्यांची कर्जे माफ होणार
राज्य सरकारने अवसायनात काढलेल्या राज्यातील पंधरा भूविकास बँकातील शेतकऱ्यांचे कर्ज व कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमेसाठी ५५० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.५५० पैकी २६७ कोटी हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तर २८३ कोटी हे कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनापोटी मिळणार आहेत. या बदल्यात पंधरा भूविकास बँकेच्या मालमत्ता सरकार ताब्यात घेणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ३२ हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी निर्णय होणार असून कर्मचाऱ्यांना १२ कोटी ४१ लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे.
www.konkantoday.com