रत्नागिरी जिह्यात वाहन खरेदीमुळे उपप्रादेशिक विभागाचा महसूल वाढला
गतवर्षी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहन खरेदी विक्रीला ब्रेक लागला होता. मात्र आता पुन्हा वाहन खरेदीला गती मिळाली आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ११ कोटी ६७ लाखाहून अधिक महसूल गोळा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. गेल्या चार महिन्यात ३ हजार ३६३ नवीन गाड्यांची नोंद करण्यात आली आहे.
www.konkantoday.com