मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळुणातील वाशिष्ठी नदीपुलावरील नव्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात, नवा पूल सप्टेंबरपासून वाहतुकीस खुला
मुंबई-गोवा महामार्गावरील
चिपळुणातील वाशिष्ठी नदीपुलावरील नव्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा नवा पूल सप्टेंबरपासून वाहतुकीस खुला होईल, अशी माहिती महामार्ग विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवाला येणार्या चाकरमान्यांचा प्रवास या नव्या पुलावरून व सुखकर होणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात वाशिष्ठी नदीवरील पुलाचे काम पहिल्यांदाच सुरू करण्यात आले. परंतु ते वेळेत पूर्ण झाले नाही. तारीख पे तारीख हे चित्र निर्माण झाले होते. त्यात कोरोना, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आलेला महापूर यामुळे हे काम संथ गतीने सुरू होते. खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे या कामाला गती मिळाली आहे. नव्या पुलाच्या दोन्ही बाजुकडील ऍप्रोच रोडचेही काम पूर्ण होत आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा पूल वाहतुकीस खुला केला जाईल. www.konkantoday.com