
चिपळूण शहरात येणार्या पुराबाबत उपाययोजना करण्या बाबत राज्याचे जलसंपदा मंत्री मा.जयंत पाटील आमदार शेखर निकम यांची चर्चा
चिपळूण शहर व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे चिपळूण शहर व परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली. या पूरजन्य परिस्थितीमुळे जनजीवनच नाही तर सर्वकाही विस्कळीत झाले. चिपळूण शहराला वारंवार येणाऱ्या पुरापासून वाचविण्यासाठी काही महत्वाच्या उपाययोजना .आमदार शेखरजी निकम यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मांडल्या.
चिपळूणमधील वाशिष्ठी व शिवनदी पात्रातील गाळ काढणे आवश्यक असल्याने तसेच वाशिष्ठी नदीमध्ये बहाद्दूरेशख नाका-फरशी पुलाजवळील पेढे-नाईक कंपनी पेठमाप ब्रीजच्या खालील बाजूस मातीचे बेट निर्माण झाले आहे ते काढणे आवश्यक आहे.
तसेच पुरसंरक्षक कामांमध्ये नदीच्या बाजूस काठावर भराव करणे,तसेच दगडी अथवा संधानक अस्तरीकरण करणे आवश्यक आहे.
वाशिष्ठी नदी चिपळूण शहरात काही ठिकाणी नागमोडी वळणाने वाहते त्यामुळे अशा ठिकाणी नदीच्या प्रवाहाला खोलीकरण व रुंदीकरण करुन उचित दिशा देणे आवश्यक आहे.नदीच्या आवश्यक ठिकाणी संरक्षक भिंत बांधणे आवश्यक आहे.गोवळकोट खाडी भागातील गाळ काढणे आवश्यक आहे.
नदीतील गाळाच्या भरावासाठी वापर करावा,जंगलतोड बंदी करावी,खाजगी जमीनी जंगल वाढीसाठी वन विभागाकडे वर्ग करण्याची तरतुद व्हावी.
चिपळूण शहरातील नदीकिनारी वृक्ष संवर्धनासाठी ग्रीन बेल्ट असतो तसा संपूर्ण नदीकिनारी भाग आरक्षित करण्यात यावा.
संपूर्ण वाशिष्ठी नदीचे सर्वेक्षण करुन सीमांकन करणे आवश्यक आहे.
डोंगर खोदण्यास व उत्खननास पूर्णपणे बंदी करणे आवश्यक आहे.
चिपळूण शहरात स्टील्ट पार्किंग करुन बांधकामे करावीत.
अशा विविध उपाययोजना होणेबाबत चर्चा होऊन या सर्व मु्द्यांवर लवकरच संबंधित अधिकाऱ्यांसह बैठक घेण्याचे जलसंपदा मंत्री मा.जयंत पाटील यांनी आश्वासन दिले
www.konkantoday.com