अंधांसाठी कोविडसहविविध आजाराची माहिती देणारे पुस्तक ब्रेल लिपीमध्ये प्रसिध्द

कोविडसहविविध आजार, त्याची कारणे व लक्षणे याची माहिती अंध व्यक्तींना ही समजावी यासाठी लोकमान्य टिळक सार्वजनिक रुग्णालयाने आजारांची माहिती देणारे पुस्तक नुकतेच प्रकाशित केले.रुग्णालयातील प्राध्यापक तसेच डॉक्टरांनी विविध आजारांची माहिती देणारे लेख यात लिहिले आहेत. अंधांसाठी उपयुक्त असणाऱ्या ब्रेल लिपीमध्ये देखील हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. नाशिक स्थित ‘द ब्लाइंड वेलफेर संस्थेने असे पुस्तक ब्रेल लिपीत छापण्यास मदत केली आहे.
या पुस्तकात मधुमेह, कान, नाक, घशाचे आजार, नेत्रविकार तसेच कोव्हीड19, कर्करोग यासारखे असाध्य आजार इ. चा यथायोग्य परामर्श घेतला आहे. याशिवाय बालविकार व स्त्रियांचे आजार यांचाही स्वतंत्र लेख नमूद केला आहे अशी माहिती डॉ. सुजाता पोळ, सहयोगी प्राध्यापिका, जनऔषधवैद्यकशास्त्र विभाग यांनी दिली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button